स्थैर्य, बारामती, दि. 30 : गाळ्याचे शटर उचकटून १९ हजार रुपयांच्या साड्या चोरून नेणाऱ्या चार महिलांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. शहरातील महावीर पथ येथील राजस्थान सारीज दुकानाच्या बेसमेंट गाळ्यातून अज्ञात चोरट्यांनी गाळ्याचे शटर उचकटून त्यातील माल चोरून नेल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात दि.१२ एप्रिल रोजी अज्ञात चोरट्यांंविरुद्ध दुकान फोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार तपास करत असताना
आमराई परिसरातील चार महिलांना ताब्यात घेऊन तपास केला असता, सदर महिलांनी गुन्ह्याची कबुली दिली. यावरून आरती शंकर पाथरकर २५ वर्षे, सारिका लाला भाले वय ३० वर्षे, दुर्गा आकाश साळुखे वय २५ वर्षे,शकिला इस्माईल कुरेशी वय २२ वर्षे यांना ताब्यात घेवुन तपास केला असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून १९ हजार १६० रूपये किंमतीचा चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर ,पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले, योगेश शेलार, सहा.फौजदार संदिपान माळी, पो.ना ओंकार सिताप, पो.कॉ पोपट नाळे, राजेश गायकवाड, सिध्देश पाटील, पोपट कोकाटे, सुहास लाटणे, अंकुश दळवी, दशरथ इंगवले अजित राऊत, योगेश कुलकर्णी, अकबर शेख, उमेश गायकवाड यांनी केली.