महाबळेश्वर तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण होऊन चार गावांचा संपर्क तुटला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ जुलै २०२२ । महाबळेश्वर । सातारा महाबळेश्वर पाचगणी वाई जावली परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे.महाबळेश्वर तालुक्यात कोयना नदीला पूर परिस्थिती निर्माण होऊन चतुरबेट साकव पूल पाण्याखाली गेल्यामुळे चतुर बेट घोणसपूर सह चार गावांचा संपर्क तुटला आहे. महाबळेश्वर व वाई तालुक्यात होत असलेल्या पावसाने सुरक्षिततेच्या दृष्टीने महाबळेश्वर तालुक्यातील दहा आणि वाई तालुक्यातील दोन अशा बारा गावातील२३३ कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे चतुरबेट पूल वाहून गेला होता. बांधकाम विभागाने सिमेंटच्या पाईप टाकून तापूरता पुल तयार केला होता तोही वाहून गेला आहे. दरम्यान या परिसरात दळणवळणासाठी लोखंडी साकवपुल तयार करण्यात आला होता. तोही पाण्याखाली गेल्यामुळे या परिसरात चार गावांचा संपर्क तुटला आहे अशी माहिती सरपंच नंदा जाधव यांनी दिली. महाबळेश्वर व वाई तालुक्यात मागील वर्षी अतिवृष्टी झाली होती. यामुळे त्यामुळे अनेक गावातील ग्रामस्थांचे खूप मोठे नुकसान झाले होते

यावेळीही मुसळधार पाऊस या परिसरात सुरूच असून महाबळेश्वर वाई तालुक्यात होत असलेल्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्पुरते स्थलांतर करणे आवश्यक असल्याने महाबळेश्वर तालुक्यातील दरे, दुधोशी, घावरी,येर्णे बु, येर्णे खुर्द, मालूसर, चिखली, माचुतर, शिंदोळा, धावली या दहा गावातील २०३ कुटुंबांचे व ९४० व्यक्तींचे स्थलांतर जिल्हा परिषद शाळा, मंदिर, खाजगी बंगले व हॉटेलमध्ये करण्यात आले आहे. वाई तालुक्यातील जोर डुईचीचीवाडी येथील ३० कुटुंबांची कुटुंबातील १६४ ग्रामस्थांचे जिल्हा परिषद शाळा, समाज मंदिर व एका घरामध्ये स्थलांतर करण्यात आले त्याची माहिती प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी दिली.

वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी कांद्याची खोऱ्यातील व तापोळा परिसरातील अतिवृष्टी ग्रस्त गावांना भेट दिली. तेथील परिस्थितीची पाहणी केली. ग्रामस्थांची संवाद साधला. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. अनेक गावातील ग्रामस्थांनी आपल्या अडचणी प्रातांधिकार्‍यांसमोर मांडल्या यावेळी तहसीलदार सुषमा चौधरी पाटील उपस्थित होत्या.


Back to top button
Don`t copy text!