
दैनिक स्थैर्य । दि. ०९ ऑक्टोबर २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यातून चार वेगवेगळ्या ठिकाणाहून चार जण बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ७ ऑक्टोंबर रोजी २.३० वाजण्याच्या सुमारास बिभवी, ता. फलटण येथून राहत्या घरातून एक युवती घरात कोणालाही काहीही न सांगता बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी मेढा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शिरवडे, ता. कराड येथील राहत्या घरातून एक युवती कॉलेजला जाते असे सांगून निघून गेली, ती अद्याप परत घरी न आल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी तळबीड पोलीस ठाण्यात दाखल केली.
दि. ७ रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास काळवीट मळा, लोणंद, ता. फलटण येथून राहत्या घरातून एक युवती कॉलेजला जाते असे सांगून निघून गेली ती अद्याप परत घरी न आल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी लोणंद पोलीस ठाण्यात दाखल केली. दि. ६ ऑक्टोंबर ते दि. ७ ऑक्टोंबर दरम्यान बिभवी, ता.फलटण येथून एक युवती घरात कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे, ती अद्याप परत न आल्याची तक्रार मेढा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.