गेल्या दोन दिवसात चार जणांच्यावर अंत्यसंस्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी सातारा पालिकेचे परफेक्ट नियोजन

स्थैर्य, सातारा, दि. 27 : कोरोना महामारीने आपले पाश आवळू लागले आहेत.सातारा शहरात क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसामान्य जिल्हा रुग्णालय आहे.याच रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णावर उपचार केले जात आहेत.याच रुग्णालयात कोरोना बाधित असलेला जिह्यातील पहिला मृत्यू झाला तेव्हाच सातारा पालिका प्रशासनाने अंत्यसंस्कार करण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेल्या सुचनेनुसार लगेच पथक तयार केले.आता सध्या दोन पथके असून त्या पथकाकडून काळजावर दगड ठेवून अतिशय काळजीपूर्वक अंत्यसंस्कार कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत.गेल्या दोन दिवसात दोन कोरोना बाधित तर दोन सारीच्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.पीपीइ किट नष्ट केले जात आहे.वापरण्यात येणारी वाहने ही सॅनिटायझर करण्यात येत आहेत.

कोरोना हा भयंकर आजार सध्या जगात फैलावत आहे.सातारा जिह्यात पहिला रुग्ण आढळून आला त्याच वेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पुढील नियोजन कसे असावे याच्या सूचना दिल्या.कॅलिफोर्निया येथुन आलेल्या त्या रुग्णाचा दुर्दैवाने मृत्यू झाला.त्या मृतयदेहावर पालिकेच्या कर्मचायांनी कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.अंत्यसंस्कार करण्यासाठी कशी तयारी हवी त्याचे नियम काय आहेत?,काय काळजी घ्यावी लागेल यासाठी जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार मुख्याधिकारी शंकर गोरे, उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांनी लगेच आरोग्य विभागातील कर्मचायांना तसे प्रशिक्षण देऊन एक पाच जणांचे पथक तयार केले.त्या पथकास पहिला अंत्यसंस्कार त्यानुसार केला.मात्र, ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यास आणखी बाधा होण्याची शक्यता गृहीत धरून सातारा येथील कैलास स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी अनुमती दिली गेली.ती जबाबदारी पालिका कर्मचायांनी लगेच स्वीकारली.

जिल्हा रुग्णालयात बधिताचा मृत्यू झाल्याचे जाहीर होताच सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सातारा पालिकेत फोन जातो.फोन जाताच पथक तयार होते.पीपीइ किट घालून शवपेटी घेऊन जिल्हा रुग्णालय गाठले जाते.जिल्हा रुग्णालयातून तो मृतदेह रुग्ण वाहिकेतून कैलास स्मशानभूमीत नेला जाऊन शवपेटी चितेवर ठेवली जाते.जर मृतदेहाच्या नातेवाईकांनी विनंती केली तर त्या नातेवाईकांना पीपीइ किट देऊन फक्त मुख दर्शन दिले जाते.अग्नी दिला जातो.लगेच साहित्य व पीपीइ किट सोबत नेलेल्या पिंपात टाकले जाते.सर्व परिसर सॅनिटायझर करून टाकला जातो.रुग्ण वाहिका सॅनिटायझर केली जाते.तो पिंप सोनगावं कचरा डेपोत डीकंपोझ केला जातो.

पालिकेचे पथक तयार असून रात्री जरी फोन आला तरी लगेच पोहचुन तासाभरात अंत्यसंस्कार केले जातात.गेल्या दोन दिवसात चार जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यातले दोन कोरोना बाधित तर दोन सारीचे रुग्ण असल्याने या पथकाने काळजीपूर्वक अंत्यसंस्कार केले आहेत.नातेवाईक हेच बनून अग्नी देतात.सर्व प्रकारची काळजी घेत असल्याने या योद्धाना कामाला सलाम ठोकावा लागेल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!