दैनिक स्थैर्य | दि. २३ जून २०२३ | सातारा |
सातारा जिल्ह्यातून चार वेगवेगळ्या ठिकाणाहून चारजण बेपत्ता झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ११ जून रोजी ७.३० वाजण्याच्या सुमारास खोडद, ता. सातारा येथील विठ्ठल उद्धव गोरे (वय ६१) हे राहत्या घरातून कोणाला काहीच न सांगता निघून गेल्याची खबर त्यांचा मुलगा किरण विठ्ठल गोरे यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली.
दुसर्या घटनेत दि. २२ रोजी ८.३० ते १२.३० वाजण्याच्या सुमारास चिंधवली, ता. वाई येथील सौ. सोनाली हेमंत चव्हाण (वय २६) ही महिला प्रियांश हेमंत चव्हाण (वय ८ महिने) याला सोबत घेऊन आई पुष्पा प्रकाश चव्हाण यांना पाहण्यासाठी पुणे येथे हेमंत प्रकाश चव्हाण यांच्याकडे जाते असे सांगून निघून गेली; परंतु ती पुणे येथे पोहोचली नसल्याची खबर तिचे पती हेमंत प्रकाश चव्हाण, रा. वडगाव शेरी, पुणे यांनी पोलिसांना दिली आहे.
तिसर्या घटनेत दि. २२ रोजी १०.३० वाजण्याच्या सुमारास सातारा येथील एका शाळेमध्ये जाते असे सांगून प्रणाली नंदकुमार गोडसे (वय १९) ही युवती निघून गेली ती घरी परत न आल्याची खबर तिचे वडील नंदकुमार गोडसे, रा. वडूज, ता. खटाव यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
चौथ्या घटनेत दि. २२ रोजी १०.३० स्वामी विवेकानंद नगर, फलटण, ता. फलटण येथून साक्षी संजय सोनवलकर (वय २०) ही मी अभ्यास करण्यासाठी तेथीलच डी.एड्. चौकातील लायब्ररीत जाते, असे सांगून घरातून निघून गेली ती घरी परत न आल्याची खबर तिची आई सौ. राणी संजय सोनवलकर यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.