बस अपघातात चार प्रवासी जखमी


 दैनिक स्थैर्य । 31 जुलै 2025 । सातारा – सातारा-रहिमतपूर मार्गे वडूजकडे येणार्‍या एसटी बसचा नायकाचीवाडी फाट्याजवळ अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची चर्चा आहे. या अपघातात चालक भोसले व वाहक माने यांच्यासह चार प्रवासी जखमी झाले आहेत. घटना घडल्यानंतर वडूज आगाराचे आगार प्रमुख प्रताप पाटील, वाहतूक निरीक्षक गणेश राऊत यांच्यासह अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली.

याबाबत घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक एम एच 11 डी एल 9260 ही एसटी सातार्‍याहून साडे सहा वाजण्याच्या सुमारास रहिमतपूर मार्गे वडूजकडे येत होती. दरम्यान गाडी नायकाचीवडी येथे आल्यानंतर बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस रस्त्यालगत असणार्‍या चरित गेली. या अपघातात बस चालक भोसले व वाहक माने यांना दुखापत झाली. तर बसमध्ये प्रवास करणारे काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काही जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!