स्थैर्य, सातारा, दि. १० : पोलिस खात्यात वेगाने कोरोनाचा शिरकाव, चार अधिकारी, 41 पोलिस कर्मचारी व 10 गृहरक्षक दलाच्या जवानांना कोरोनाची लागण पोलिस उपाधीक्षक सूरज गुरव यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील चौघेजण कोरोनबाधित आढळल्याने पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे. पोलिस उपाधीक्षक कार्यालयातील कामाकाजात विस्कळीतपणा आला आहे. अनेक महत्वाची कामे ठप्प आहेत. उपाधीक्षक गुरव यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील अन्य दोन कर्मचारीही बाधीत झाले आहेत.तालुक्यात पोलिस उपाधीक्षक गुरव यांच्यासह चार अधिकारी, 41 पोलिस हवालदार तर 10 गृहरक्षक दलाचे जवानही बाधीत ठरले आहेत. कोरोनाचा तालुका व शहरात मोठा कहर वाढतो आहे. त्यामध्ये कोरोना योद्धांनाही कोरोनाच्या कचाट्यात अडकावे लागत आहे. आजअखेर तालुक्यात तब्बल 300 कोरोना योद्धे बाधीत ठरले आहेत. त्यात आरोग्य, पोलिस खात्यातील कोरोनाबाधित सर्वाधिक आहेत. आरोग्य खात्यापेक्षाही पोलिस खात्यातील कर्मचाऱ्यांची संख्या जास्त झाली आहे. पोलिस उपाधीक्षक गुरव यांनाही मंगळवारी कोरोनाची लागण झाली आहे.श्री. गुरव यांच्यासह त्यांच्या घरातील चार सदस्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे. सोमवारी गुरव यांनी टेस्ट केली. ती मंगळवारी रात्री पॉझिटिव्ह आली आहे.
तालुक्यातील महत्वाच्या अधिकाऱ्यानाही कोरोनाची बाधा होवू लागली आहे. यापूर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्याशिवाय त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह उपजिल्हा रुग्णालयातील 25 जणांना कोरोनाने ग्रासले आहे. पोलिस खात्यात वेगाने कोरोनाचा शिरकाव होत आहे. त्यामध्ये चार अधिकारी, 41 पोलिस कर्मचारी व 10 गृहरक्षक दलाच्या जवानांना कोरोनाची लागण झाली आहे.