
दैनिक स्थैर्य । दि.०४ मे २०२२ । सातारा । सातारा तालुक्यातील मालगाव येथे येथे घरफोडी करून आपणास चोरट्यांनी सुमारे ३ लाख ९८ हजार ८०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व मोबाईल चोरुन नेले. ही घटना दि. १ मे रोजी साडे पाच वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबतची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत सातारा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १ मे रोजी साडे पाच वाजण्याच्या सुमारास मालगाव, ता. सातारा येथील विठ्ठल संभाजी हबाळ वय ४८ यांच्या बंद घरात प्रवेश करून चोरट्यांनी ३८ हजार ६०० रुपये किमतीचे सोन्याचे गंठण, ५८ हजार ८०० रुपये किमतीची सोन्याची चेन, ५० हजार ४०० रुपये किमतीचा सोन्याचा बदाम, ६३ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, ८४ हजार रुपये किमतीचे नेकलेस, २ हजार किमतीचा मोबाईल चोरुन नेले. यानंतर घटनास्थळी कोरेगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी किद्रे यांनी भेट दिली आहे.