दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑक्टोबर २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक यांना शंभर रुपयांमध्ये एक किलो चणाडाळ,एक किलो रवा, एक किलो साखर व एक लिटर पाम तेल यांचा शिधा संच 100 रुपयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे राज्य शासनाने सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे येत्या दोन दिवसांमध्ये या शिधासंचाचे वाटप तातडीने सुरू करण्यात येईल अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे देवकाते यांनी दिली आहे.
राज्य शासनाने सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी शिधासंच देण्याचा निर्णय घेऊन महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह कंजूमर लिमिटेड यांच्याकडून ऑनलाइन पोर्टल द्वारे खरेदी निविदा प्रक्रियेमध्ये मान्यता दिली आहे त्या अंतर्गत सातारा जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब अशा शिधापत्रिकाधारकांची साधारणता चार लाख संख्या आहे या सर्व लाभार्थ्यांना एक किलो रवा एक किलो चणाडाळ एक किलो साखर व एक लिटर पांम तेल अशा चार शिधा जिन्नसांचा समावेश असून हा शिधा संच केवळ शंभर रुपयांमध्ये लाभार्थ्यांना प्राप्त होणार आहे.
प्रत्येक तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील शासकीय गोडाऊनमध्ये हा माल उतरवण्यात येणारा असून त्याचे वितरण तालुका पुरवठा निरीक्षकांच्या माध्यमातून केले जाणार आहे साधारण 22 ऑक्टोबर पर्यंत ही वितरण प्रणाली कार्यान्वित राहणार असून सर्व लाभार्थ्यांना शिधा संच मिळतील याची काळजी घेण्यात येणार आहे शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका ईपॉस प्रणाली द्वारे शंभर रुपयाच्या दरात उपलब्ध होणार आहे सदरील संच सातारा जिल्ह्यात तातडीने मिळण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाचा पाठपुरावा सुरू असून हे संच शासकीय गोडाऊनमध्ये पाठवून तेथून रेशन दुकानदारांना दिले जाणार आहेत सातारा जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांनी दिवाळीपूर्वी आपल्या रेशनिंग दुकानदारांकडून हा शिधा संच नियमित अन्नधान्य व्यतिरिक्त विहित वेळेत सवलतीच्या दरात घेऊन जावा आणि दिवाळी भेट योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे देवकाते यांनी केले आहे.