
दैनिक स्थैर्य । दि.२६ मार्च २०२२ । वाई । येथील हरिहरेश्वर सहकारी बँकेच्या ४२कोटी ९६ लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी चौघांना सातारा येथील न्यायालयाने जामीन मंजूर केला.
हरिहरेश्वर सहकारी बँकेच्या ४२कोटी ९६ लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी बोगस प्रकरणांचा सर्च व व्हॅल्यूएशन रिपोर्ट देणाऱ्या चौघांना सातारा आर्थिक गुन्हे शाखेने १५ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. यामध्ये ऍड ललित सूर्यकांत खामकर,ऍड अविनाश अशोक गाडे,तुषार सखाराम चक्के, अमोल खोतलांडे यांचा समावेश होता.
याबरोबरच बँकेचे संस्थापक नंदकुमार खामकर यांच्यासह २९ जणांवर गुन्हा दाखल असून याप्रकरणात खामकर यांचे बंधू रमेश ज्ञानेश्वर खामकर व बँकेचे सरव्यवस्थापक रमेश दगडू जाधव यांनाही आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेले आहे. मागील आठवड्यात ऍड ललित सूर्यकांत खामकर,ऍड अविनाश अशोक गाडे,तुषार सखाराम चक्के,अमोल खोतलांडे व सरव्यवस्थापक रमेश दगडू जाधव यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.या आठवड्यात यावर सुनावणी झाली. बुधवारी सातारा येथील वरिष्ठ स्तर न्या एन एल मोरे यांनी ऍड ललित सूर्यकांत खामकर,ऍड अविनाश अशोक गाडे,तुषार सखाराम चक्के,अमोल खोतलांडे यांचा अपहाराशी सबंध नाही व सर्व अपहार संस्थापक नंदकुमार खामकर व सहकाऱ्यांनी केला असल्याचे मत नोंदवत त्यांना जामीन मंजूर केला.तरसरव्यवस्थापक रमेश दगडू जाधव यांचा जामीन अर्ज फेटाळला. याकामी मोहन यादव,धीरज घाडगे,सागर मोरे,महेश शिंदे,शांताराम शेलार व सरकार पक्षाच्या वतीने मिलींद ओक या वकिलांनी काम पाहिले.