पार्टीला मत न दिल्याच्या कारणावरून वरखडवाडीत मारहाण प्रकरणी अट्रोसिटीसह मारहाणीचा चौघांवर गुन्हा दाखल


स्थैर्य, वाई, दि.21: येथील वरखडवाडीतील (ता वाई) एका कुटुंबातील सदस्यांनी पार्टीला मतदान न केल्याने घरात घुसून चौघांनी जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याने चौघांवर वाई पोलीस ठाण्यात मारहाणीचा व अट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये तीन जण जखमी झाले आहेत.वरखडवाडीत तणाव निर्माण झाला होता.
वाई तालुक्यातील वरखडवाडी ग्रामपंचायतीचे मतमोजणी दिवशी सायंकाळी प्रकाश बबन रांजणे हे घरात सायंकाळी टीव्ही पहात बसले होते.त्याच वेळी वैभव बाजीराव साळुंखे,पंकज दामोदर पवार,प्रसाद सर्जेराव साळुंखे,विशाल आनंदराव फणसे (सर्व रा.वरखडवाडी)हे घरात घुसून तू आमच्या पार्टीला का मतदान केले नाही म्हणत जातीवाचक शिवीगाळ करत हातातील काठीने मारहाण केली.त्यात सौ.अश्विनी रांजणे, कृष्णा महादेव रांजणे, शिवाजी महादेव सपकाळ यांना मारहाण झाल्याने ते चार जण जखमी झाले. या प्रकरणी प्रकाश रांजणे यांनी मारहाण करणाऱ्या चौघांवरअट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला. विभागीय पोलीस अधिकारी डॉ.शीतल जानवे-खराडे अधिक तपास करत आहेत.

Back to top button
Don`t copy text!