
दैनिक स्थैर्य । दि. १६ ऑक्टोबर २०२२ । सातारा । येथील औद्योगीक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला असलेल्या गुरूशिल्प आपार्टमेंट या इमारतीचे गेट चोरून नेहल्याप्रकरणी दत्ता बापू गोपनार रा. वनवासवाडी, ता. सातारा,अमोल बाबासो शिंदे रा.संगमनगर, सातारा यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रिझवान महमंद शेख रा. करंजे, सातारा यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, सातारा शहरातील गुरूशिल्प आपार्टमेंटच्या मुख्य गेटला बसवलेले लोंखडी गेट वरील दोन्ही संशयितांनी दि.१४ रोजी चोरूने नेहल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबतचा अधिक तपास महिला अमंलदार एम. बी.अवघडे या करत आहेत.