
स्थैर्य, सातारा, दि. 13 ऑगस्ट : गणेश आगमन सोहळ्यादरम्यान मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावणे, लेझर लाइटचा वापर करणे, तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चौघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रजनीकांत चंद्रकांत नागे (वय 41, रा. मल्हार पेठ), धीरज रमेश महाडिक (रा. कला व वाणिज्य कॉलेजजवळ, सातारा), दीपक राजेंद्र जगताप (रा. इंद्रायणीनगर, भोसरी, पुणे) व हर्षल राजाराम शिंदे (रा. पाटखळ, ता. सातारा) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत हवालदार अमोल साळुंखे यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी निघालेल्या मिरवणुकीत देवी चौक येथे ट्रॅक्टर चालक हर्षल शिंदे व रजनी साउंडचे मालक रजनीकांत नागे यांनी ट्रॅक्टर ट्रॉलीचे बाहेर लोखंडी अँगल लावल्याचे, तसेच मोठ्या प्रमाणात रविवारी शहरातील काही मंडळांनी गणेश आगमन सोहळा साजरा करण्यासाठी गणेशमूर्तीची मिरवणूक काढली होती.
गणेश आगमन सोहळ्यादरम्यान पोलिसांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करण्याच्या सूचना यापूर्वीच गणेशोत्सव मंडळ व ध्वनिक्षेपक यंत्रणांच्या मालकांना दिले होते, तरीही गणेश मंडळांच्या ध्वनिक्षेपक यंत्रणा आणि अन्य प्रकाश योजनेच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या कारवाईच्या भूमिकेमुळे आगामी आगमन सोहळ्यांच्या दिवशी नागरिकांना त्रास होणार नाही, अशी अपेक्षा आहे.कर्णकर्कश आवाज केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले, तसेच ट्रॅक्टरचे ट्रॉलीवर धीरज महाडिक व दीपक जगताप यांनी बीम लाइट, तसेच एलईडी स्क्रीनही लोकांच्या डोळ्यास त्रास होईल, अशा पद्धतीने लावली होती, तसेच यामुळे रस्त्याने येणार्या – जाणार्या लोकांना अटकाव होत होता, तसेच नागे यांनी पोलिसांनी दिलेल्या आदेशाची अवज्ञा केली. ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागे लावलेल्या जनरेटरचा टेंपो थांबवण्यास पोलिसांनी सांगितले होते, तरीही तो परस्पर विनापरवानगी घेऊन गेल्याचे साळुंखे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

