मासिक गुन्हे आढावा बैठकीत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला चार पुरस्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १७ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी आज जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांची गुन्हे बैठक आयोजित केली होती. सदर गुन्हे बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल या उपस्थित होत्या. या बैठकीमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून वेगवेगळ्या प्रकारामध्ये बक्षीस दिले जाते. या बैठकीत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याला चार बक्षिसे प्रदान करण्यात आली.

या पुरस्कारांमध्ये फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याला सर्वात जास्त मालमत्ता हस्तगत केली म्हणून २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले. दुसरा पुरस्कार २०२३ मध्ये सर्वोत्तम अजामीनपात्र वॉरंटची बजावणीबाबतचे बक्षीससुद्धा फलटण ग्रामीण पोलिसांना मिळाले. तिसर्‍या पुरस्कारात पोलीस ठाण्यातील मुद्देमाल निर्मितीचे तिसरे बक्षीस फलटण ग्रामीण पोलिसांना मिळाले. तर चौथ्या पुरस्कारात जानेवारी २०२४ मध्ये सर्वात जास्त मालमत्ता हस्तगतचे चौथे बक्षीस फलटण ग्रामीण पोलिसांना मिळाले.

ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस हवालदार नितीन चतुरे, पोलीस नाईक तात्या कदम, पोलीस अंमलदार अमोल जगदाळे, हनुमंत दडस, संजय देशमुख, उर्मिला पेंदाम, वैभव सूर्यवंशी, संजय अडसूळ, चालक पोलीस आमदार योगेश रणपिसे व मदने यांनी केली आहे. त्यांना संपूर्ण फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या स्टाफचे सहकार्य लाभलेले आहे.


Back to top button
Don`t copy text!