डिझेल चोरीप्रकरणी झारखंडमधील चारजणांना अटक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.१८: पाटण तालुक्यातील अनुतेवाडी (जिंती) येथे रस्त्याचे काम सुरु असताना जेसीबी आणि पोकलँड मशीनमधून ऑईल चोरुन नेल्याप्रकरणी झारखंड येथील चौघांना ढेबेवाडी पोलिसांनी अटक केली. रणजित दास, अकरम अंसारी, इरशार अंसारी, एकरामूल अंसारी अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मनोज रघुनाथ पाटील (वय ४२, रा. बनपुरी, ता. पाटण) हे ठेकेदार असून त्यांच्या अनुतेवाडी (जिंती) येथील रस्त्याच्या कामासाठी जेसीबी आणि पोकलँड लावले आहेत. यातून रणजित रामेश्वर दास, अकरम अली अंसारी, इरशार दिलमहंमद अंसारी, एकरामूल नईम अंसारी (सध्या रा.अJनुतेवाडी, जिंती, ता. पाटण. मूळ रा. हजारीबाग, राज्य : झारखंड) या चौघांनी बुधवार, दि. १३ रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ८ हजार ४०० रुपये किमंतीचे १०५ लिटर डिझेल चोरुन नेले. डिझेलचोरीचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर मनोज पाटील यांनी या चौघांच्याविरोधात ढेबेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंर चारही परप्रांतियांवर गुन्हा दाखल झाला होता. यानंतर ढेबेवाडी पोलिसांनी या चौघांनाही अटक केली आहे. अधिक तपास सहायक फौजदार आर. एस. पानवळ हे करत आहेत.

Back to top button
Don`t copy text!