संचारबंदी मोडल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा


स्थैर्य, सातारा, दि.११: लॉकडाऊन काळात फक्त अत्यावश्यक वाहनांना परवानगी असताना विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या चार वाहनचालकांवर शाहुपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे

याबाबत माहिती अशी, जिल्हाधिकारी सो.सातारा यांनी सातारा जिल्हयात अधिसुचना काढुन साथरोग प्रतिबंध कायदा लागु केला आहे. तसेच लॉकडाऊनलाही दि. 15 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. असे असतानाही 1) रविंद्र शंकर पाठक वय 72 वर्षे , रा 514 मंगळवार पेठ सातारा 2 ) शामराव ईब्राहीम शेख वय 34 वर्षे , रा बाबर कॉलनी करंजे सातारा 3 ) इजाज इकबाल शेख वय 33 वर्षे रा. गेंडामाळ नाका शुक्रवार पेठ सातारा 4 ) विनोद विजय शिखरे वय 27 वर्षे रा . 47 व्यंकटपुरा मंगळवार पेठ सातारा यांनी आपली वाहने विनाकारण रस्त्यावर आणुन संचारबंदी कायद्याचा भंग करून स्वत:च्या तसेच इतरांचे जिवीतास धोका उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे .
याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.


Back to top button
Don`t copy text!