स्थैर्य, फलटण दि.२७ : फलटण तालुक्यातील वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर 96 गावांमध्ये संस्थात्मक विलगीकरण कक्ष कार्यान्वीत असून फलटण पंचायत समितीच्या माध्यमातून या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. दिनांक 25 मे रोजी मिळालेल्या आकडेवारीनुसार या 96 विलगीकरण कक्षामध्ये 225 कोरोना बाधीत रुग्ण दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरु आहेत.
फलटण तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला असल्याने गावोगावी विलगीकरण कक्ष सुरु होणे आवश्यक बनले होते. त्यानुसार हे विलगीकरण कक्ष कार्यान्वीत करण्यात आले आहेत.
दि.25 मे रोजीच्या आकडेवारीनुसार गावनिहाय विलगीकरण कक्षात दाखल असलेली रुग्णसंख्या कंसात याप्रमाणे –
धुळदेव (10), अलगुडेवाडी (0), राजाळे (0), सोनगाव (0), साठे (3), खटकेवस्ती (6), गोखळी (25), आसू (4), ढवळेवस्ती आ.(0), जाधववाडी ता. (3), हणमंतवाडी (0), निंबळक (6), शेरेशिंदेवाडी (0), नाईकबोमवाडी (0), गुणवरे (0), मुंजवडी (2), बरड (0), राजुरी (3), कुलवली बु. (0), आंदरुड (1), जावली (0), वडले (0), तिरकवाडी (0), सोनवडी खुर्द (0), जाधववाडी (5), भाडळी बु. (0), भाडळी खु. (0), निरगुडी (1), गिरवी (2), विंचुर्णी (0), कुरवली खु. (0), दालवडी (0), मिर्याचीवाडी (0), उपळवे (1), जाधवनगर (0), दर्याचीवाडी (0), सावंतवाडी (0), वेळोशी (9), मानेवाडी (0), ताथवडा (0), ढवळ (1), शेरेशिंदेवाडी ढ.(0), पिराचीवाडी (0), वाखरी (0), वाठार निं. (9), विडणी (2), जोर पुनर्वसन कु. (0), जोर पुनर्वसन वाखरी (0), तावडी (0), मिरगाव (0), खडकी (0), वडजल (1), काशीदवाडी (0), भिलकटी (0), ढवळेवाडी नि. (0), सुरवडी (10), नाांदल (16), घाडगेमळा (0), सस्तेवाडी (0), चौधरवाडी (0), जिंती (0), कांबळेश्वर (0), सांगवी (2), घाडगेवाडी (0), वडगांव (0), वाघोशी (1), बिबी (21), आळजापूर (0), कापशी (0), आदर्की बु. (0), आदर्की खु. (0), उळुंब (0), शेरेचीवाडी (1), हिंगणगाव (7), आरडगाव (3), सालपे (6), तांबवे (12), चांभारवाडी (0), कोरेगाव (0), पाडेगाव (15), तरडगाव (9), विठ्ठलवाडी (0), मुळीकवाडी (0), टाकोबाईचीवाडी (0), रावडी खु. (0), रावडी बु. (0), मुरुम (0), होळ (2), साखरवाडी (15), खराडेवाडी (0), तडवळे (9), काळज (3), डोंबाळेवाडी (0).