
दैनिक स्थैर्य । दि. २४ जून २०२३ । मुंबई । जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात शुक्रवारी आदरांजली वाहण्यात आली. यावेळी भाजपा प्रदेश मुख्यालय सहप्रभारी सुमंत घैसास, कार्यालय सहसचिव भरत राऊत, सदाशिव चौधरी आदी उपस्थित होते. डॉ. मुखर्जी यांच्या हौतात्म्याचे स्मरण करण्यासाठी त्यांचा स्मृतीदिन देशभर ‘बलिदान दिवस’ म्हणून पाळण्यात येतो.