दैनिक स्थैर्य । दि. १५ ऑक्टोबर २०२२ । सातारा । भारतीय इतिहासात दि. 15 ऑक्टोबर 1932 रोजी समाजामध्ये मानाचे स्थान नसणाऱ्या व कायमचे समाज सुधारणापासून वंचीत व मागास रहिलेल्या समाजासाठी बँकवर्ड क्लास वेलफेअर डिपार्टमेंटची स्थापना झाली. दि. 15 ऑक्टोंबर 2022 रोजी या घटनेला 90 वर्षे पुर्ण होत आहेत. या नऊ दशकामध्ये अनेक स्थित्यंतरे होऊन आजचा सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग अस्तित्वात आला आहे. या दिवसाची आठवण म्हणून दि. 15 ऑक्टोंबर 2022 हा दिवस सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाचा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी दिली.
या दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयुट ऑफ सायन्स, सातारा या महाविद्यालयाच्या A-1 हॉलमध्ये सकाळी 11 वा. जिल्हास्तरावरील कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमास जिल्हयातील जास्तीत जास्त नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सामाजिक न्याय विभागातर्फे करण्यात आले आहे.