
दैनिक स्थैर्य | दि. २० फेब्रुवारी २०२५ | फलटण |
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गडकिल्ले स्वच्छता मोहीम डॉ. बी. आर. आंबेडकर आय.आय.टी.च्या विद्यार्थ्यांनी राबवून आगळीवेगळी शिवजयंती साजरी केली.
फलटणपासून २५ किलोमीटर अंतरावर असलेला ‘संतोषगड’ हा किल्ला समुद्रसपाटीपासून २९०० फूट उंच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६३० मध्ये हा किल्ला बांधला. किल्ल्याला मुख्य तीन दरवाजे असून गोमुक स्थापत्यशैलीत बनविलेले आहे व आतमध्ये अंतर्गत एक गुप्त दरवाजा आहे. गडावर आजही विहिरीला पाणी आहे.
डॉ. बी. आर. आंबेडकर आय.आय.टी.पासून सर्वजण पायी चालत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आले. महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा प्रवास सुरू झाला. ताथवडा या गावात पोहोचल्यानंतर गावातील सर्व माननीय सदस्यांनी ग्रामसेवक, सरपंच व इतर ग्रामस्थ यांनी सर्वांचे जोरदार स्वागत केले व या मोहिमेबद्दल कौतुक केले. कचर्याचे विघटन कुठे व कसे करायचे, याचे मार्गदर्शन केले.
मोहिमेत दोन तास गड चढून गेल्यानंतर गडाची स्वच्छता करण्यात आली. विद्यार्थ्यांनी पोवाडा, भारुड व स्वतःचे मनोगतही यावेळी व्यक्त केले. सर्व महिला स्टाफने मिळून बाळ शिवबाचा पाळणा गायला.
अतिशय उत्साहात ही एक आगळीवेगळी शिवजयंती साजरी करण्यात आली.