
स्थैर्य, फलटण, दि. 2 ऑक्टोबर : सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी संचालक आणि आसू शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक सिकंदर रमझान शेख यांचे मंगळवार, दि. ३० सप्टेंबर रोजी हृदयविकाराने निधन झाले.
त्यांचे पार्थिव बुधवारी सकाळी कोळकी येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर बरड (ता. फलटण) या त्यांच्या मूळ गावी सकाळी अंत्यविधी पार पडले.
शेख यांनी आपल्या नोकरीच्या काळात फलटण तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात काम केले होते आणि त्यांचा जनसंपर्कही मोठा होता. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.