
दैनिक स्थैर्य | दि. 19 जुलै 2025 । विडणी । येथील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा युवा उद्योजक शरद कोल्हे यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांच्यासह राजे गटाला राम राम ठोकत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
यावेळी विडणीचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी यावेळी स्पष्ट केली कि, तालुक्यातील जनता आता कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाही. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात विडणी जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
यावेळी धुळदेव येथील कर्णे वस्ती येथे धुळदेव गावातील शेकडो निष्ठवांत नेते, कार्यकर्ते यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.