
दैनिक स्थैर्य | दि. २ डिसेंबर २०२४ | फलटण |
सरदार वल्लभभाई हायस्कूल, साखरवाडीचे माजी प्राचार्य श्री. गणपत विठ्ठल भोसले (ग. वि. भोसले सर, वय ७४ वर्ष) यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
भोसले सर हे गणित विषयाचे शिक्षक होते. खूप तळमळीने ते शिकवत असत. शेतकर्यांच्या, गरिबांच्या मुलांनी शिकावे ही त्यांची मनापासूनची इच्छा असायची.
भोसले सर यांना त्यांचे कुटुंबिय, विद्यार्थी, मित्रपरिवार व मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.