माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची उदयनराजे यांनी घेतली भेट


दैनिक स्थैर्य | दि. १० नोव्हेंबर २०२१ | सातारा | देशाच्या माजी राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई पाटील या कोल्हापूरहुन पुण्याकडे जात असताना सर्किट हाउस सातारा येथे थांबल्या होत्या. यावेळी त्यांचे पती देवीसिंग शेखावत व कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते. खासदार उदयनराजे भोसले यांनी सौ प्रतिभाताई यांची भेट घेत स्वागत केले. त्यांच्या सोबत विविध विषयांवर तासभर सविस्तर चर्चा झाली व प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांना व कुटुंबियांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या सहकुटुंब सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर गेल्या होत्या. महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन त्या मंगळवारी पुण्याकडे निघाल्या होत्या. पुण्याकडे जात असताना त्या सकाळी 11 च्या सुमारास सातारा येथील सर्किटवर पोहचल्या. त्यानंतर काही काळ विश्रांती केली. त्याचवेळी खा. उदयनराजे भोसले यांनी त्याचे स्वागत करत सुमारे तासभर चर्चा केली. यावेळी त्यांचे पती देवीसिंग शेखावत व कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते. सौ प्रतिभाताई यांच्या सोबत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करत जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. तर राज्यसह देशभरात घडत असलेल्या राजकीय घटनांवर चर्चा करण्यात आली. व प्रकृतीची विचारपूस केली.


Back to top button
Don`t copy text!