लेझीम खेळताना माजी पोलिस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २६ एप्रिल २०२२ । कोरेगाव । चंचळी तालुका कोरेगाव येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाचा छबिना पुढे लेझीम खेळताना हृदयविकाराचा झटका येऊन सेवानिवृत्त सहाय्यक फौजदाराचा मृत्यू झाला दशरथ मारोती कदम वय 71 असे मृताचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना रविवारी रात्री साडेबाराच्या दरम्यान घडली कदम यांच्या मृत्यूमुळे यात्रेवर सावट आले तालुक्यातील ही दुसरी घटना आहे.

भोसे येथे आठवड्यापूर्वीच शासन काठी नाचताना विजेचा धक्का बसून एका युवकाचा मृत्यू झाला होता. छबिन्या समोर लेझीम खेळून झाल्यावर कदम एका जागी जाऊन बसले त्यातच त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला कदम यांच्या मृत्यूनंतर तात्काळ छबिना थांबवण्याचा निर्णय यात्रा कमिटीने घेतला सोमवारी सकाळी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे.

दशरथ कदम यांनी राज्य पोलीस दलात शिपाई म्हणून सेवेस प्रारंभ केला हवालदार साहेब फौजदार म्हणून कोल्हापूर सह पाचगणी पुसेगाव वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली होती त्यांच्या कामाची दखल घेऊन वेळोवेळी पोलिस दलाने त्यांचा सन्मान देखील केला होता.


Back to top button
Don`t copy text!