पंचायत समितीचे माजी कृषी अधिकारी कृष्णा (बापू) तागडे यांचे निधन


स्थैर्य, फलटण (कोळकी), दि. ०८ फेब्रुवारी : मालोजीनगर, कोळकी येथील रहिवासी तसेच फलटण पंचायत समितीचे माजी कृषी अधिकारी कृष्णा सावळाराम तागडे (बापू) यांचे आज दिनांक ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने फलटण तालुक्यातील शासकीय व कृषी क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कृषी विभागात प्रामाणिक, शेतकरीहितैषी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. पंचायत समितीत कार्यरत असताना त्यांनी अनेक शेतकरी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून दिला होता. त्यांच्या कार्यकाळाची आठवण आज अनेक सहकारी व शेतकरी कृतज्ञतेने करत आहेत.

त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी १.०० वाजता फलटण स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक व आप्तेष्ट असा मोठा परिवार आहे.


Back to top button
Don`t copy text!