
दैनिक स्थैर्य । 27 एप्रिल 2025। फलटण । फलटण वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड. नितीन जाधव, उपाध्यक्षपदी अॅड. सागर देशपांडे, सचिव अॅड. निलेश भोसले, सह सचिव अॅड. अभिषेक राऊत, महिला सदस्य अॅड. निकिता रसाळ, अॅड. स्वरदा चंद्रकांत जाधव यांची निवड झाली. त्यानिमित्त माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते वकील संघाच्या नुतन पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संघाचे अॅड. सचिन शिंदे, अॅड. राहुल बोराटे, अॅड. विवेक ढालपे, अॅड. राजेंद्र यादव व इतर वकील उपस्थित होते.
फलटण वकील संघाच्या माध्यमातून दिवाणी वरिष्ठ न्यायालय स्थापन करणे, पुढील भविष्यातील वीस वर्षाचा विचार करता, प्रशस्त व सर्व सोयींनी युक्त अधिकार गृह, इमारती लगत नवीन सुसज्ज न्यायालय इमारत उभारणी कामी पाठपुरावा करून येणार्या काळामध्ये भव्य दिव्य न्यायालय इमारत फलटणमध्ये उभे करण्याचा आश्वासन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. सचिन पाटील यांनी वकील संघास दिले.
तसेच केंद्र व राज्य सरकारवतीने जलद न्याय योजनेचा पक्षकारांना लाभ मिळण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय, विधी न्याय विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. सचिन पाटील दिले.