माजी मंत्री बाळासाहेब भेगडे यांनी घेतली खासदार उदयनराजे यांची भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०९ नोव्हेंबर २०२२ । सातारा । मावळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व माजी मंत्री बाळासाहेब भेगडे यांनी मंगळवारी खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर येथे भेट घेतली. लोकसभा प्रवासी योजनेवर त्यांनी सुमारे 40 मिनिटे उदयनराजे यांच्याशी सविस्तर चर्चा केली आगामी केंद्र शासनाच्या योजना संदर्भात आणि रणनीती संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी बाळासाहेब भेगडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी उदयनराजे भोसले यांचे समर्थक सुनील काटकर इत्यादी यावेळी उपस्थित होते सध्या केंद्र शासनाचे विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या अभियान सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जेपी नड्डा हे लोकसभा प्रवास योजनेच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रांतांच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्याच्या अनुषंगाने माजी आमदार बाळासाहेब भेगडे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली या योजनांचा प्रसार आणि प्रचार केंद्र शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यानिमित्ताने लोकसंवाद आणि संघटनात्मक बांधणी या विविध मुद्द्यांवर बाळासाहेब भेगडे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

बैठकीनंतर बाळासाहेब भेगडे यांनी पत्रकारांना माहिती दिली लोकसभा प्रवास योजना हे भाजपचे महत्त्वकांक्षी अभियान आहे हे अभियान म्हणजे केंद्र शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा प्रसार आणि प्रचार हे मुख्या अभियान आहे या अभियानांतर्गत लोकसंवाद आणि लोकांपर्यंत या योजनांचे फायदे पोहोचवणे हा त्यामागचा खरा हेतू आहेत खासदार उदयनराजे भोसले आमचे आदरणीय नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनांतर्गत सातारा शहरासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये या योजनांची प्रसिद्धी करणे लोकांपर्यंत पोहोचणे याकरता विशेष रणनीती आखली जात आहे याचा उपयोग आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने होणार आहे जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेसाठी सातत्याने सक्रिय राहणार असून आगामी काळातील कोणत्याही आव्हानासाठी आम्ही सज्ज असल्याचे बाळासाहेब भेगडे यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!