म्हसवडचे माजी नगराध्यक्ष विजय धट यांचे बंधू नितीन यांचे निधन; दिड महिन्यात दुसर्‍यांदा बंधूशोक


दैनिक स्थैर्य । दि. २१ सप्टेंबर २०२१ । म्हसवड । म्हसवड पालिकेचे माजी नगराध्यक्ष विजय धट यांचे धाकटे बंधू व सह्याद्री गार्डन ढाब्याचे मालक नितीन रामचंद्र धट वय 38 यांचे सोमवारी सकाळी व्यायाम करत असताना जोराचा हार्ट अटॅक आल्याने जागेवरच कोसळले. त्यांना तातकाळ त्यांचे बंधू विजय यांनी उपचारासाठी खाजगी संचित हॉस्पिटल येथे अ‍ॅडमिट केले. मात्र, तोपर्यंत त्यांचे निधन झाले होते. दीड महिन्यापुर्वीच त्याचे थोरले बंधू राजकुमार वय 46 यांचे निधन झाले होते. दीड महिन्याच्या आत विजय धट यांचे दोन तरुण बंधूचे निधन झाल्याने त्यांच्या मनावर मोठा धक्का बसला आहे.

नितीन धट नेहमी प्रमाणे पहाटे साडेपाच वाजता घरातच व्यायामाचे साहित्य असल्याने व्यायाम करत होते तर त्यांचे थोरले बंधू विजय धट हे बाहेरील जिममध्ये व्यायामाला जात होते. ते जिममध्ये जाण्याच्या तयारीत असताना काही तरी दुसर्‍या खोलीत पडल्याचा आवाज झाल्याने त्याखोलीत गेले असता नितीन तेथे पडल्याचे दिसताच तातडीने त्यांना संचित हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाल्याचे डॉ. प्रमोद गावडे यांनी सांगितले. नितीन यांच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ, बहिण, भावजय असा परिवार आहे. दीड महिन्यात धट परिवाराला दुसरा मोठा धक्क बसल्याने म्हसवड व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सोमवारी दुपारी दिड वाजता म्हसवड येथील स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!