
दैनिक स्थैर्य | दि. ११ ऑगस्ट २०२४ | फलटण |
श्रीराम सहकारी साखर कारखाना लि. फलटणचे माजी कार्यकारी संचालक व फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मे गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य रामचंद्र विनायकराव निंबाळकर यांचे सातारा येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.
निंबाळकर यांच्यावर आज रविवार, दि. ११ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता वैकुंठ स्मशानभूमी, फलटण येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
रामचंद्र निंबाळकर यांना राजे ग्रुप, फलटण, कुटुंबिय व मित्रमंडळींनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.