दैनिक स्थैर्य । दि. ३० नोव्हेंबर २०२२ । सातारा । मालमत्ता कराची 19 लाख 3 हजार 412 रुपये थकवणाऱ्या माजी नगरसेवकाचे सदर बझार येथील चार गाळे सातारा पालिकेने सील केले आहे त्यामुळे थकबाकीदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे पालिकेच्या वसुली विभागाने एकदम आक्रमक पवित्रा घेतल्याने भल्या भल्यांचे धाबे दणाणले आहेत.
सदर बाजार येथील रोहन हाइट्स या इमारतीत एका माजी नगरसेवकाचे चार गाळे आहेत या गाळ्यांची गेल्या 20 वर्षापासून 19 लाख 3 हजार 412 रुपयांची थकबाकी आहे संबंधित मिळकत धारकांना थकबाकी भरण्याबाबत वारंवार नोटीस बजावण्यात आली होती मात्र त्यांच्याकडून कोणती हालचाल न झाल्याने अखेर प्रशासक व मुख्याधिकारी आयोजित बापट यांच्या आदेशानुसार सोमवारी रोहन हाईटस या इमारतीमधील चार गाळ्यांना सील ठोकण्यात आले.
या कारवाईत वसुली विभागाचे प्रमुख प्रशांत खटावकर सुभाष राठोड गणेश कांबळे छोटू बागुल यांनी कारवाई भाग घेतला वसुली विभागाने बडी बडी धेंडे रडारवर घेतल्याने थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे मागील वर्षाची थकबाकीचा आकडा 21 कोटी पेक्षा अधिक आहे त्यामुळे त्याच्या जास्तीत जास्त वसुलीसाठी वसुली विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे यापुढेही ही वसुली मोहीम गतीने सुरू राहणार असल्याचे वसुली अध्यक्ष प्रशांत खटावकर यांनी सांगितले आहे.