माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी यांचं निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. ०३ : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी यांचे काल रात्री निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ७५ वर्षांच्या होत्या. मागच्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. १४ मे १९६४ रोजी मनोहर जोशी यांचा अनघा यांच्याबरोबर विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

अनघा जोशी यांच्या मागे पती मनोहर जोशी, पुत्र उन्मेष जोशी, अस्मिता आणि नम्रता या दोन कन्या, जावई गिरीश व्यास असा परिवार आहे. आज सकाळी त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!