कृषीदूतांकडून ललगुण येथे शेतकरी गटाची निर्मिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ३० ऑगस्ट २०२४ | फलटण |
खटाव तालुक्यातील ललगुण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटीअंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदूतांनी ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२०२५ कार्यक्रमांअतर्गत शेतकरी गटाची निर्मिती केली. कृषीदूतांनी गावातील शेतकर्‍यांचा व्हॉट्सअ‍ॅपवर या सोशल मीडियावर शेतकरी गट तयार केला.

या गटात अंतर्गत पीक उत्पादन, रोग व किडींचे निवारण, सरकारी योजनेचा प्रसार, प्रगतशील शेतकर्‍यांची यशोगाथा, शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान, सेंद्रीय शेतीची माहिती, खोडवा उसाचे नियोजन कसे करावे, तसेच शेतमालच्या बाजारभावाबद्दल माहिती व शेतीच्या निगडित समस्यांच्या निवारणाबद्दल माहिती प्रसारित केली जाते. यावेळी गावातील शेतकरी उपस्थित होते.

यासाठी कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य श्री. डॉ. यु. डी. चव्हाण सर, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणचे प्राचार्य श्री. डॉ. एस. डी. निंबाळकर सर, समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत उदयसिंह गायकवाड, सुमित बागुल, ओंकार खेडकर, गौरव रायकर, अमितेश बोदडे, आदित्य घेवारे यांनी हा उपक्रम राबवला.


Back to top button
Don`t copy text!