स्थैर्य, मुंबई, दि.०८: लॉकडाऊन आणि कोव्हिड-१९ च्या कटू वास्तविकतेदरम्यान, अनेक लोकांना जागरूक ठेवणारी आणि मनोरंजन करणारी एकमेव गोष्ट म्हणजे सोशल मीडिया आणि क्रिएटिव्ह ऑनलाइन कंटेंट. याच पार्श्वभूमीवर, जेएल स्ट्रीम अॅप हे नव्या काळातील कंटेंट क्रिएटर्समध्ये एक आकर्षण बनले आहे.
जेएल (जल्दी लाइव्ह) स्ट्रीम हे जानेवारी २०२१ मध्ये सुरु झालेले स्टार्ट अप आता विविध पसंती असलेल्या लोकांच्या मोठ्या गटाला सेवा देत वन-स्टॉप एंटरटेनमेंट डेस्टिनेशन बनले आहे. ५०० हजार पेक्षा जास्त डाऊनलोड्ससह, यात कविता कौशिक, पलक मुचल, जसबीर जस्सी, दल्लजित कौर, पूजा मिश्रा, अली कुली मिर्झा आणि सोफी चौधरी यांच्यासारख्या अनेक इन्फ्लूएंसर आणि प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. खरं तर, मासिक महसूलात १००,००० यूएसडी वाढ होत असली तरीही अॅपने लाइव्ह स्ट्रीमिंग क्षेत्रात आधीच बेंचमार्क प्रस्थापित केला आहे.
एकमेव आणि वैशिष्ट्यपूर्ण सुविधांसह, हे अॅप यूझर्सना तत्काळ लाईव्ह जाण्यास मदत करते. तसेच जगभरातील समविचारी लोकांना भेटण्याची आणि चॅट करण्याची संधी दिते. यात चॅट आणि मॅच फिचर असून याद्वारे जगातील समविचारी आणि समान कल्पना असेलल्या लोकांशी याद्वारे कनेक्ट करता येते. या अॅपमध्ये अनेक प्रकारच्या गंमतीसह मोठे मनोरंजन आहे. तसेच काही महत्त्वपूर्ण सुविधाही यात अपडेट केल्या जाणार आहेत.
२०२२ या वर्षापर्यंत भारतीय डिजिटल मीडिया २२.४७% च्या सीएजीआरसह २३,६७३ रुपयांपर्यंत पोहोचेल, असे डेंत्सुच्या हवाल्यासह, माध्यमांत सांगण्यात आले आहे. तसेच २०२५ पर्यंत भारतीय लोकसंख्येपैकी ६७% लोक सोशल नेटनवर्क सर्व्हिस प्लॅटफॉर्म वापरतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावरून असे दिसते की, भारतातील ऑनलाइन कंटेंट मार्केट वाढत जाईल आणि जेएल स्ट्रीमसारखे अॅप मनोरंजन क्षेत्रात नवी शिखरे गाठत तरुण पिढीला मदत करत राहतील.