दैनिक स्थैर्य । दि. १६ नोव्हेम्बर २०२२ । फलटण । डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे प्रबुद्ध विद्या भवन या प्रशालेला कोरियन विद्यार्थिनी ‘ एरीन ‘ ने सदिच्छा भेट दिली.एरीन ने फर्ग्युसन कॉलेज पुणे व लंडन येथे शिक्षण घेतले आहे ती सध्या भारत भ्रमंतीवर असून तिने अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहेत. प्रबुद्ध विद्या भवन चे संचालक मिलिंद अहिवळे यांची ‘एरीन ‘यांच्याशी इंग्लंडमध्ये भेट झाली आहे.एरीन चे आई वडील हे दोघेही शिक्षक असल्याने तिला शिक्षणात विशेष रस आहे. या भेटीदरम्यान तीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसारक मंडळाच्या उपक्रमांची व प्रबुद्ध विद्या भवन मध्ये राबवल्या जाणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी एरीन यांच्या हस्ते प्रबुद्ध विद्या भवन च्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष सिद्धार्थ प्रबुद्ध,प्रबुद्ध विद्या भवन चे मुख्याध्यापक यशवंत कारंडे,शिक्षक महादेव गुंजवटे,जयश्री होनराव, वनिता मोरे, संघमित्रा अहिवळे व इतर उपस्थित होते.