बारामती टेक्स्टाईल पार्क पाहून परदेशी विद्यार्थी अचंबित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ मार्च २०२२ । बारामती । आंतरराष्ट्रीय रोटरीच्या परदेशी विद्यार्थी आदान प्रदान कार्यक्रमांतर्गत रोटरी डिस्ट्रिक्ट आणि रोटरी क्लब बारामती यांनी संयुक्त विद्यमाने परदेशी विद्यार्थ्यांची भेट बारामती एमआयडीसी मधील बारामती हाय टेक टेक्स्टाईल पार्क या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.

या प्रसंगी आंतरराष्ट्रीय रोटरी कडून इरोहा सुई (जपान), पेड्रो हेरीरा मोलीना (स्पेन), ल वूरा डी (ब्राझील), गेब्रीएला नटाचा (फ्रान्स), फेलीप आरडीगोंडा सीलवा (ब्राझील), सिमोन मालींगर (फ्रान्स), ज्युलिया हरुमी (ब्राझील) विन्सेन्स ई मील (जर्मनी) यासीन कासिआ डि-सूझा (ब्राझील), वेरोनिका कोस्टा फरिआ (ब्राझील), हेनरी क्यू दि इलिया सेन (ब्राझील) अर्थूर फेरी इरा लीओ(ब्राझील) हे उपस्तीत होते व कॉटन किंग चे मुख्य व्यवस्थापक खंडू गायकवाड व टेक्स्टाईल पार्क चे अधिकारी अनिल वाघ यांनी सर्व विद्यार्थ्यांना टेक्स्टाईल पार्क व कॉटन किंग मधील कामाची पद्धत, महिलांचा रोजगार, कापड तयार करणे ते फिनिशिंग व आयात निर्यात , कामगार वाहतूक, आदी बदल माहिती दिली व विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन केले.

बारामती टेक्स्टाईल पार्कचे अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील महिलांना रोजगार निर्मिती करून देताना कापड क्षेत्रातील अनेक उदोजक निर्माण झाले व बारामती टेक्स्टाईल पार्क ची ओळख जगात निर्माण झाली असल्याचे खंडू गायकवाड यांनी सांगितले.

याप्रसंगी रोटरी क्लब बारामतीचे अध्यक्ष रो. प्रा. डॉ. अजय दरेकर, सचिव रो.अरविंद गरगटे,खजिनदार रो. रविकिरण खारतोडे, असिस्टंट गव्हर्नर रो. निखिल मुथा, युथ डायरेक्टर अलीअसगर बारामतीवाला, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या युथ डायरेक्टर रो.शोभा नहार, परदेशी विद्यार्थी युवक आदान प्रधान कार्यक्रमाच्या संचालक सारिका रोडे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न केले.

४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे

फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.

संपर्क : 8888006611 (WhatsApp)


Back to top button
Don`t copy text!