फलटणमध्ये दिवसाढवळ्या दहा लाखाची चोरी; शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 21 नोव्हेंबर 2022 | फलटण | फलटण शहरातील नामवंत सराफाच्या दुकानांमधील एक कर्मचारी बँकेत पैसे भरण्यासाठी लक्ष्मी नगर भागामधून जात होता. जाणाऱ्या कर्मचाऱ्यास दोघांनी अडवून त्याच्या डोक्यामध्ये वार केले व त्याच्या दुचाकी (मोपेड) मध्ये ठेवलेले रुपये दहा लाख 80 हजार घेऊन पोबारा केला. यामुळे फलटण शहरातील व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण तयार झालेले आहे.

याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेली माहिती अशी की, दि. 21 नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सनी हणमंत इंगळे हे आयसीआयसीआय बँकेच्या फलटण शाखा येथे रुपये दहा लाख 80 हजार या कॅशचा भरणा करण्यासाठी शहरातील शांतीकाका सराफ यांच्या दुकानांमधून एक्टिवा या मोपेड गाडीवरून लक्ष्मी नगर मधून जात असताना शाईन मोटरसायकल वरून दोघे जणांनी दमदाटी करत हातातील हत्याराने मारून त्यावेळी गाडीच्या डिक्कीमध्ये असलेली रोख रक्कम रुपये दहा लाख 80 हजार घेऊन पोबारा केलेला आहे.

याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केनेकर करीत आहेत.

घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे व पोलीस निरीक्षक दादासाहेब पवार यांनी भेट दिली.


Back to top button
Don`t copy text!