दैनिक स्थैर्य । दि. २३ ऑगस्ट २०२२ । फलटण । फलटण शहराचे उपनगर समजले जाणाऱ्या जाधववाडी (फ) गावच्या हद्दीमध्ये तत्कालीन तलाठी भरत शंकर चव्हाण यांनी बनावट सातबारे तयार करून ते शासकीय अभिलेख असल्याचे भासवले असल्याने फलटणचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी भरत शंकर चव्हाण यांच्याबाबत सक्तीची सेवानिवृत्तीचे आदेश पारित केलेले आहेत.
याबाबत खात्रीशीर सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, भरत शंकर चव्हाण यांची जाधववाडी (फ) च्या तलाठी पदी नियुक्ती असताना त्यांनी आपल्या शासकीय पदाचा गैरवापर करून बनावट सातबारे तयार केले व ते सातबारे शासकीय अभीलेखाचा भाग असल्याचे भासवले. बनावट सातबारांच्या आधारे त्यांनी खरेदीखत सुद्धा शासन दरबारी नोंदवले. त्यानंतर फेरफार मंजूर न होता, फेरफार शासकीय अभिलेखा मधले नोंदवले गेले. त्यानुसारच जाधववाडी (फ) मध्ये बनावट प्रकारते दस्ताऐवज तयार झालेले आहेत. सदर प्रकरणामुळे फलटणचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी भरत शंकर चव्हाण तत्कालीन तलाठी जाधववाडी (फ) यांना सक्तीची सेवानिवृत्तीचे आदेश पारित केलेले आहेत.