
स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक, दि.१० (रणजित लेंभे) : सध्या सगळीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, आणि अशा परिस्थितीत प्रत्येकाची रोग प्रतिकार शक्ती वाढली पाहिजे. त्यासाठी डॉ मोमीन यांनी आर्सेनिक या होमिओपॅथिक औषधाच्या दोन हजार डब्या आपल्या गावासाठी देत भूमिपुत्राचे कर्तव्य बजावले आहे.
ज्या जन्मभूमीत आपण जन्माला येतो,त्याचे आपण काहीतरी देणं लागतो हाच विचार जोपासत कोरेगाव तालुक्यातील देऊर- दहीगावशी नात असलेल्या डॉ.मोमीम व सौ डॉ.मोमीन या दांपत्याने जवळपास दोन हजार आर्सेनिक अलब्म 30 च्या गोळयाचे मोफत वितरण केले.
सामाजिक कामात नेहमीच एक पाऊल पुढं टाकणारे हे डॉ. दांपत्य सुरुवातीला देऊर,वाठार स्टे या ठिकाणी राहत क्लिनिक या नावाने सर्वपरिचित झालं यानंतर त्यांनी सातारा येथील बुधवार पेठेत स्वतःच हे क्लिनिक सुरू करुन आज या ठिकाणी ते सेवा बजावत आहेत.
देऊर दहीगाव बरोबरच ज्या ठिकाणी डॉ मोमीन आरोग्य सेवा बजावत आहेत त्या सातार मधील बुधवार पेठेतील लोकांनाही त्यांनी या गोळया दिल्या आहेत, जन्मभूमी कर्मभूमी साठी कायमच मी पुढाकार घेतला आहे. सध्या कोरोना ची महामारी सर्वदूर पसरली आहे अश्या प्रसंगी लोकांनी सरकारी सूचनांचे पालन करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी अश्या सूचना डॉ मोमीन यांनी केल्या आहेत.