वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाचे ‘आषाढी वारी २०२२’ ॲप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ जून २०२२ । पुणे । आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना वारीबाबत माहिती होण्यासाठी व त्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘आषाढी वारी 2022’ ॲप विकसित करण्यात आले आहे.

या ॲपमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मार्गाचे वेळापत्रक व गावनिहाय नकाशा, पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या थेट दर्शनाची सोय, पालखीचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख यांचे संपर्क क्रमांक, वैद्यकीय सुविधा त्यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी, फिरते वैद्यकीय पथक, शासकीय रुग्णालये व वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकरी, खासगी वैद्यकीय व्यावसायिक, पाण्याच्या सुविधेच्या दृष्टीने मार्गावरील टॅकर सुविधा, अन्न पुरवठा आणि वितरणबाबत, विद्युत सेवा, पशुधन बाबत सेवेसाठी संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.

पालखी सोहळ्याशी संबंधित विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकदेखील या ॲपमध्ये देण्यात आले आहेत.  भाविकांनी गुगल प्लेस्टोवरील https://play.google.com/store/apps/details?id=com.deecto.ashadhiwari या लिंकवरुन आषाढी वारी 2022 हे ॲप डाऊनलोड करुन घ्यावे. तसेच भाविकांनी वारीदरम्यान अडचणीच्या वेळी या ॲपवरील संबंधित संपर्क अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!