स्थैर्य, सातारा, दि. २९: सातारा शहरालगतचे मोठे उपनगर असलेल्या शाहूपुरी येथील विविध प्रकारचे प्रश्न सातत्याने सोडवले आहेत. प्रत्येक कॉलनीतील अंतर्गत रस्ते, शाहूपुरीसाठीची नवीन पाणीपुरवठा योजना मार्गी लावली. हद्दवाढीत शाहूपुरीचा समावेश झाला असून आता या परिसराचा झपाट्याने विकास होणार आहे. शाहूपुरीच्या सर्वांगिण विकासासाठी कधीच कमी पडलो नाही आणि यापुढेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
शाहूपुरी येथील पेढ्याचा भैरोबाला जाणाऱ्या रस्त्यासाठी आमदार फंडातून ८.५ लाख रुपये आणि कृष्णेश्वर मंदिर ते समाधीचा माळ या रस्त्यासाठी ५ लाख रुपये मंजूर झाले. या दोन्ही रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरसेवक अविनाश कदम, भारत भोसले, निवृत्त जिल्हा कृषी अधिकारी सी.जे.बागल,शाहूपुरी ग्रामविकास आघाडीचे ग्रा.पं.सदस्य राजेंद्रकुमार मोहिते, नवनाथ जाधव, सुहास वहाळकर, शोभाताई केंडे, निलमताई देशमुख, माधवीताई शेटे, माजी उपसरपंच विकास देशमुख, माजी सदस्य आप्पा गोसावी, राम धुमाळ, दिलीप कडव, पिंटू कडव, महेंद्र गायकवाड, महेश जांभळे, पप्पू बालगुडे, बाळासाहेब निकम, राजेंद्र केंडे, राम धुमाळ, बापू ताटे , राजेंद्र कदम, महादेव खुडे सर, शहाजीराव देशमुख सर, जाधव सर, माने दादा, रघुनाथ मनवे, रामभाऊ येवले, संजय झोरे, विठ्ठल चव्हाण,दयाळ काका, कुमठेकर काका,थोरात सर, गणेश गडकरी,शिवराज ताटे,तुषार जोशी,गणेश वाघमारे, कमलाकर जाधव, महेंद्र गायकवाड, मनोज कडव यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
शाहूपुरी येथील पेढ्याचा भैरोबा देवस्थानला प्राचिन परंपरा असून ते जुन्या सातारवासियांचे अतिशय महत्त्वाचे श्रध्दास्थान असल्याने या देवस्थानच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यात एक आंतरिक समाधान असल्याची भावना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली. सातारा शहर व शाहूपुरी परीसरांतील अनेक अबालवृद्ध, महिला व भाविक पेढ्याच्या भैरोबाला नेहमीच जात असतात. पावसाळ्यात या रस्त्याचा वापर करणे अवघड होते. मागील काही वर्षात जवळपास निम्म्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण केले होते. आता उर्वरित रस्त्याचे कामही मार्गी लावले आहे. या देवस्थान परिसरात यापूर्वीच स्ट्रिटलाईटची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे, असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
समाधीचा माळ या रस्त्याच्या कामात लोकांच्या गरजा ओळखून काम करा. यासाठी लागणा-या अतिरिक्त निधीची लोकप्रतिनिधी या नात्याने मी व्यवस्था करतो, अशी सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केली. दोन्ही रस्त्याची कामे मार्गी लागल्याने शाहूपुरीकरांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाला हणमंतराव एरगट्टीकर,निकम, तात्या जाधव,साबळे सर, पवार सर,श्री.लोहार, श्री.भोईटे,श्री.अरुण बागल, सौ.नंदाताई बागल, सौ.माधुरीताई भोईटे, सौ.लोहार, सौ.बालगुडे, सौ.देवरे, सौ.देशमुख, सौ.कोरडे, सौ.झोरे, होनराव,कदम मामा ,गणेश वाघमारे, कमलाकर जाधव, राजेंद्र कदम, महादेव खुडे सर,सादिक आतार, मनोज कडव,पंडीतकाका,पिंपळे सर,अमित कोरडे,राहुल बागल व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.