दैनिक स्थैर्य । दि. २८ जानेवारी २०२३ । आटपाडी । फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन च्या वतीने भारताच्या 74 व्या प्रजासत्ताकदिनी सत्यशोधक समाज स्थापना दिन शताब्दी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आटपाडी मध्ये प्रथमच जनता दलाचे जेष्ठ समाजसेवक आबासाहेब सागर यांनी फुले शाहू आंबेडकर कॉम्प्लेक्सचे वास्तू पूजन महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या सत्यशोधक पद्धतीप्रमाणे विधिकर्ते सत्यशोधक व संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ ढोक यांनी पार पाडली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आरपीआयचे नेते राजेंद्र खरात,राजेंद्र कांबळे,काँग्रेस चे अनिल वाघमारे , जेष्ठ समाजसेवक संताजी देशमुख , सनी पाटील साहेब, ॲड.सचिन सातपुते आवरजुन उपस्थितीत होते.यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते थोरमाजसुधारक महात्मा फुले ,ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्ध पुतळ्यास व सम्राट बळीराजा यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यापूर्वी देखील सागर यांच्या मुलीचा 2 Feb.2021 रोजी सत्यशोधक विवाह तसेच नुकतेच वडिलांचे निधनानंतर तुकाराम महाराज यांचे वर प्रकट व्याख्यान आयोजित करून आज सत्यशोधक वास्तू पूजन केल्यामुळे संताजी देशमुख, सनी पाटीलसाहेब,सुनील भिंगे ,सुभाष कांबळे आणि भारत वाघमारे यांनी आबासाहेब सागर हे नुसते विचार सांगणारे नसून महापूर्षांचे कृतिशील कार्य करणारे वारसदार आहेत असे सांगून त्यांनी आपल्या आटपाडीमधे भव्य इमारत उभारून फुले शाहू आंबेडकर कॉम्प्लेक्स नाव देऊन सर्वांपुढे आदर्श ठेवलेला आहे.त्यांचेकडून भविष्यात असे मोठे प्रकल्प उभारून सामाजिक शेत्रात अजून नावलौकिक मिळो अशा भरपूर शुभेचछा दिल्या.
फुले एज्युकेशन तर्फे सागर कुटुंबीयांना सत्यशोधक ढोक व मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची फोटो फ्रेम आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सन्मानपत्र देऊन सन्मानित केले. तर ढोक यांनी पुण्यावरून येऊन नेहमीप्रमाणे हे कार्य मोफत पार पाडले म्हणून संताजी देशमुख व इतर मान्यवरांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
यावेळी सत्यशोधक ढोक म्हणाले की सर्व समाजाने अंधश्रद्धा ,कर्मकांड याला फाटा देत घरातील सर्व कार्य सत्यशोधक पद्धतीप्रमाणे सागर यांचा आदर्श घेऊन निर्भिडपणे करावेत.पुढे ढोक असेही म्हणाले की आपल्या जवळच माझ्या वावरहिरे या गावी सत्यशोधक पदधतीप्रमाणे विवाह करण्यासाठी फुले एज्युकेशन तर्फे संपूर्ण सोय मोफत केली आहे त्याचा लाभ घेऊन नाहक होणारे आर्थिक नुकसान टाळून वधुवर अथवा गरजूंना शिक्षणासाठी मदत करावी असे देखील म्हंटले.
यावेळी विधान परिषदेचे माजी आमदार ॲड.रामहरी रुपनवर , शिवसेनेचे नेते तानाजी जाधव आणि सांगली, सोलापूर, सातारा,अकलूज परिसरातून देखील बहुजन समाज हे विधीकार्य पहाण्यासाठी व वास्तूला भेट देण्यासाठी आवरजून उपस्थित होते.
शुभम आणि संग्राम सागर यांनी यावेळी मोलाची मदत केली.