स्थैर्य, दि.१: कोविड-19 मुळे संकटात सापडलेली
भारतीय अर्थव्यवस्था हळु-हळू पुर्ववत होत आहे. अर्थव्यवस्था पटरीवर येत
असल्याचे संकेत गुड्स अँड सर्विसेज टॅक्स (GST) कलेक्शनमधून मिळाले आहे.
अर्थ मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये जीएसटी कलेक्शन
1.05 लाख कोटींपेक्षा जास्त झाले आहे. फेब्रुवारीनंतर म्हणजेच कोरोना
लॉकडाउन काळात पहिल्यांदाच जीएसटी कलेक्शनने 1 लाख कोटींचा आकडा पार केला
आहे.
80 लाख GSTR-3B रिटर्न फाइल झाले
अर्थ
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत 80 लाख GSTR-3B
रिटर्न फाइल झाले. यामुळे ऑक्टोबर-2020 ग्रॉस जीएसटी रेव्हेन्यू 1,05,155
कोटी रुपयांवर आला. यात 19,193 कोटी रुपयांचा सीजीएसटी, 5,411 कोटी
रुपयांचा एसजीएसटी आणि 52,540 कोटी रुपयांचा आयजीएसटी सामील आहे. तसेच,
आयजीएसटीमधून आयात केलेल्या सामानाद्वारे आलेले 23,375 कोटींचाही यात
समावेश आहे.
मागच्या वर्षीपेक्षा 10% जास्त रेव्हेन्यू
अर्थ
मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, ऑक्टोबर 2020 मध्ये जीएसटी कलेक्शन
मागच्या वर्षीपेक्षा 10% जास्त झाले आहे. मागच्या वर्षी ऑक्टोबर 2019 मध्ये
जीएसटी कलेक्शन 95,379 कोटी रुपये होते.
कॅलेंडर ईअर 2020 मध्ये जीएसटी कलेक्शन
महिना | कलेक्शन (कोटी रु. मध्ये) |
जानेवारी | 1,10,828 |
फेब्रुवारी | 1,05,366 |
मार्च | 97,597 |
एप्रिल | 31,294 |
मे | 62,009 |
जून | 90,917 |
जुलै | 87,422 |
ऑगस्ट | 86,449 |
सप्टेंबर | 95,480 |
ऑक्टोबर | 1,05,155 |