
दैनिक स्थैर्य । दि. २८ ऑक्टोबर २०२२ । शिवडी । एक समाज एक संघ वैचारिक संघटना व या संघटनेस संलग्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व जेष्ठ नागरिक कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतीक कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली जेष्ठ नागरिक कट्टा, भोईवाडा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर कार्यक्रमास माटुंगा लेबर कॅम्पचे आयु. भगत उपस्थित होते त्यानी दिपदान महोत्सवाची सुरवात केव्हा व कशी झाली यासंदर्भात मार्गदर्शन करीत असताना “भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्या नंतर कपिलवस्तू येथे निमंत्रण आले होते, त्यावेळी कपिलवस्तू येथे जात असताना तेथील सिद्धोधन राजाने लक्ष लक्ष दिव्यांची रोषणाई करून तथागतांचे स्वागत केले, त्याचप्रमाणे सम्राट अशोकांने कार्तिकी अमावस्येला जन्माला आलेल्या महामायेच्या जन्माचे औचित्य साधून त्याने दहा परिमित्यांचे पालन करून, शेवटच्या दिवशी म्हणजेच कार्तिक अमावस्येला त्याने संकल्प सोडला की भगवान गौतम बुद्धाने जी २०८४ व्याख्याने दिली त्यानुसार भारतभूमीमध्ये २०८४ कातळशिल्पे मी कोरणार व त्यावेळी आनंदोत्सव साजरा करताना लक्ष लक्ष दिपदान करण्यात आले अश्या प्रकारे दिपदानोत्सव संपन्न झाला, परंतु नंतर काहींनी याला वेगळे स्वरूप व सोबत काल्पनिक कथांची जोड देऊन वेगळाच बनावटी सण निर्माण केला परंतु काही असलं तरी हा दिपदानोत्सव खऱ्या अर्थाने बुद्ध धम्माची देणं आहे” असे प्रतिपादन त्यानी केले.
सदर कार्यक्रमास अनेक शाखांतील स्त्री, पुरुष व जुनेजाणते कार्यकर्ते उपस्थित होते, शिवडी विभागाचे गटप्रतिनिधी जेष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते व कवी रामदासजी धो. गमरे यांना आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले होते, विनंतीस मान देऊन रामदासजी गमरे ही कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिले होते, त्यानी ही सर्वांना मार्गदर्शनात्मक माहिती देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप मोहिते यांनी केले, या कार्यक्रमाची पार्श्वभूमी व त्यामागील इतिहास या विषयावर प्रबोधनात्मक मार्गदर्शन करून बावीस प्रतिज्ञा देण्यामागील उद्देश याबाबतचे मार्गदर्शन ही त्यानी केले, सदर प्रसंगी विशेष सहकार्य केल्याबद्दल खरे बाबा, कॅरमपटू निलम भीमराव घोडके, प्रमुख उपस्थिती राजाभाऊ तथा रामदास गमरे, भगत जी आदि मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले व देशाच्या नागरिकांमध्ये संविधान जागरूकता होण्यासाठी भारताचे संविधानाचे मोफत वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप मोहिते, प्रसेनजित कांबळे, नरेश सकपाळ, नरेंद मोहिते, सीताराम कांबळे आदीनी मोलाचे सहकार्य व अथक परिश्रम घेतले व प्रथमच आयोजित करण्यात आलेला दिपदानोत्सव यशस्वीरीत्या आयोजित केल्याबद्दल प्रतीक कांबळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.