निर्यातक्षम शेतमाल उत्पादनासाठी के. बी. ने टाकले पुढचे दमदार पाऊल : सचिन यादव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ जुलै २०२३ । फलटण ।

प्रत्येक शेतकरी रेसिड्यू फ्री शेती सोबतच आपल्या पिकाचे भरघोस उत्पादन कसे घेईल आणि आपला शेतमाल निर्यातक्षम कसा उत्पादित करु शकेल हा उद्देश ठेवून के. बी. ने प्रारंभापासून योग्य उत्पादनांची निर्मिती व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्याचे सांगत त्यापैकीच ही नवी उत्पादने असल्याची ग्वाही के. बी. चे संचालक सचिन यादव यांनी दिली.

के. बी. बायो ऑरगॅनिक्स प्रा. लि. च्या वनस्पतीजन्य उत्पादनांचे लॉंचिंग कंपनीचे संचालक सचिन यादव यांच्या हस्ते मुख्य कार्यालय, फलटण येथे समारंभपूर्वक करण्यात आले, त्यावेळी कंपनीचे राजस्थान येथील डिलर्स, कंपनीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. भारतामध्ये सध्या ऑरगॅनिक शेती करण्याकडे आणि त्यासाठी लागणाऱ्या रसायनमुक्त प्रॉडक्ट खरेदीकडे शेतकऱ्यांचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. शेतकऱ्यांची मागणी आणि त्याचे सद्य स्थितीचे महत्व जाणून के. बी. बायो ऑरगॅनिक्स प्रा. लि. ही वनस्पतीजन्य उत्पादने निर्माण करत असणारी पहिली कंपनी असून, या कंपनीने लिक्विड फॉर्ममधील पेस्टीसाईड्स आणि पीजीआर च्या अद्भुत यशानंतर ग्रॅन्युअल्स फॉर्ममधील ‘न्यूट्रालाईट प्लस ग्रॅन्युअल्स’ आणि ‘नोवा झाईम प्लस ग्रॅन्युअल्स’ ही उत्पादने नुकतीच लॉंच करुन शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरीव वाढ होण्यासाठी त्यांचा समावेश केला असल्याचे यावेळी संचालक सचिन यादव यांनी निदर्शनास आणून दिले.    ‘न्यूट्रालाईट प्लस ग्रॅन्युअल्स’ हे असे उत्पादन आहे जे जमिनीतील क्षारांचे प्रमाण कमी करुन जमिनीचा सामू नियंत्रित करण्याचे कार्य करते, तसेच जमिनीतील अन्नद्रव्यांचे बॉण्डिंग तोडून अन्नद्रव्ये अपटेक करुन पिकाची जोमदार वाढ करुन देणारे एकमेव आणि ग्रॅन्युअल फॉर्ममधील पहिले अद्वितीय प्रॉडक्ट असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले.

‘नोवा झाईम प्लस ग्रॅन्युअल्स’ पिकाच्या सर्वांगीण वाढ व विकासासाठी अधिक फुल धारणेसाठी, फुलांचे रुपांतर फळांमध्ये होण्यासाठी तसेच फुल व फळांची गळ रोखण्यासाठी मार्कर कंपाउंड्सपासून निर्माण केलेले उत्पादन असून पिकाच्या आवश्यकतेनुसार व अवस्थेनुसार पोषक घटक पुरवून भरघोस उत्पादन मिळवून देणारे प्रॉडक्ट असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

या दोन्ही उत्पादनांचा उपयोग शेतकरी बेसल डोस, टॉप ड्रेसिंग व ब्रॉडकास्टिंग मध्ये करु शकणार आहेत आणि विश्वास आहे या प्रॉडक्ट्सचा शेतकऱ्यांच्या शेतमाल उत्पादनात मोलाचा वाटा ठरणार असल्याचे स्पष्ट करताना ही  उत्पादने १ किलो, ४ किलो, ८ किलो आणि २० किलो या पॅकेजिंग साईज मध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

भारतातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही उत्पादने जवळच्या कृषी सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध असतील. सर्व शेतकऱ्यांनी या उत्पादनांचा जरुर वापर करावा व भरघोस उत्पादन घ्यावे असे आवाहन संचालक सचिन यादव यांनी केले. विशेष बाब म्हणजे या प्रॉडक्ट लॉंचिंग कार्यक्रमादरम्यान उपस्थित असणाऱ्या राजस्थान डीलर्स बांधवांनी या उत्पादनाची डेमोसह सविस्तर माहिती घेतली आणि ही उत्पादने शेतकऱ्यांना शेतमाल उत्पादन वाढीसाठी अद्वितीय ठरतील असे मत आणि विश्वास व्यक्त केला.


Back to top button
Don`t copy text!