अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील उद्योजकांसाठी दि. २३ जानेवारी रोजी मुंबई येथे मेगा इव्हेंटचे आयोजन


दैनिक स्थैर्य । दि. २१ जानेवारी २०२३ । सातारा । सुक्ष्म, लघु आणि मध्यम मंत्रालय, भारत सरकार यांचे उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी एमएसएमई मंत्रालया अंतर्गत (भारत सरकार) वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई येथे दि. 23 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता मंत्री, सुक्ष्म, लघु आणि मध्यम मंत्रालय, भारत सरकार यांच्या अध्यक्षतेखाली मेगा इव्हेंट आयोजित करण्यात आला असल्याची माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी दिली.

सदर मेगा इव्हेंट जन जागृतीसाठी आणि लक्ष्यीत लाभार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त लाभ पोहचविण्यासाठीचा उपक्रम लोकांसोबत शेअर करण्यासाठी हे चांगले व्यासपीठ आहे. या मेगा इव्हेंटचा अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती उद्योजकांसाठी क्षमता वाढविण्यास आणि त्यांना सार्वजनिक खरेदीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात मदत होणार आहे.

तरी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील उद्योजकांनी दि. 23 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10.00 वा. वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई येथे मोठया संख्येने उपस्थित राहून मेगा इव्हेंटचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त श्री.  उबाळे  यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!