स्थैर्य, फलटण : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांचेमार्फत राबवत असलेल्या डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेचे सुविधा केंद्र FC 6766, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात उपलब्ध आहे. मंडळाने अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 सप्टेंबर 2020 सांगितली आहे. प्रवेश प्रक्रिया व शिष्यवृत्तीच्या अधिक माहितीसाठी महाविद्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन प्राचार्य डॉ. अजय देशमुख यांनी केली आहे.
तथापि कोवीड संसर्गामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्र उपलब्ध होताना अडचणी येतअसल्या, तरी किमान शाळा सोडल्याचा दाखला व दहावी पास चे गुणपत्रक इत्यादीवर विद्यार्थ्यांनी सुविधा केंद्रामध्ये येऊन नोंदणी करावी असे आवाहन करण्यात येत आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडे सध्या जात प्रमाणपत्र किंवा नॉन क्रिमीलेअर उपलब्ध नसले तरी त्यांनी चार सप्टेंबर पूर्वी नोंदणी करून घ्यावी,तरच त्यांना त्यांची स्कॉलरशिप मिळणार आहे तसेच सर्व विद्यार्थ्यांनी नंतर कागदपत्रे उपलब्ध करून दिले तरी शासनाच्या स्कॉलरशिप चा लाभ घेता येणार आहे.
याशिवाय महाविद्यालयातर्फे सर्व जाती धर्मातील मुला मुलींसाठी इयत्ता दहावी मध्ये 85 टक्के पेक्षा जास्त मार्क मिळविलेल्या विद्यार्थ्यांना “श्रीमंत मालोजीराजे मेरिट स्कॉलरशिप” अंतर्गत महाविद्यालयात मोफत प्रवेश देण्यात येतो सर्व SC,ST च्या विद्यार्थ्यांना संपूर्ण फी मध्ये सवलत मिळते.EBC, SEBC व OBC च्या विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 टक्के सवलत मिळते. सर्व NT च्या विद्यार्थ्यांना रुपये 6000 मध्ये प्रवेश मिळतो. तरी या सवलतींचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.