
दैनिक स्थैर्य । दि. ०२ डिसेंबर २०२२ । फलटण । फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर, विद्यानगर, फलटण या शाळेत महात्मा फुले पुण्यतिथीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांचा फूड फेस्टिवल व भाजी मंडई हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या फूड फेस्टिवल व भाजी मंडईचे उद्घाटन माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी स्कूल कमिटीच्या व्हाईस चेअरमन सौ. वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर, ज्ञानेश्वर देशमुख, श्रीकांत फडतरे तसेच श्रीमती कुचेकर, सौ. काकडे, सौ. शेख, शिंदे हे प्राथमिक शाळांचे सर्व मुख्याध्यापक तसेच बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ.राजश्री खलाटे उपस्थित होत्या.
यावेळी शाळेतील पालकांबरोबरच परिसरातील नागरिकांनीही उस्फुर्त प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. आनंदी वातावरणात हा उपक्रम पार पडला यासाठी मुख्याध्यापिका सौ. वैशाली जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.