
दैनिक स्थैर्य । दि. ०८ डिसेंबर २०२१ । फलटण । फलटणचे ग्रामदैवत असलेले श्री कालभैरवाच्या जयंती निमित्त आयोजित अन्नदानास मायभूमी फौंडेशनच्या वतीने भरघोस मदत करण्यात आली.
मायभूमी फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री कालभैरवाच्या जयंती निमित्त भैरोबा गल्ली, फलटण व श्रीमंत संजीवराजे नगर, फलटण येथे श्री कालभैरव जयंती निमित्त आयोजित अन्नदानास भरघोस मदत करण्यात आली.
यावेळी मायभूमी फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (ओबीसी सेल) चे अध्यक्ष मिलिंद नेवसे, नगरसेविका सौ. प्रगती भाऊसोा कापसे, दूध संघाचे माजी अध्यक्ष भीमदेव बुरुंगले, श्रीराम कारखान्याचे संचालक महादेव माने, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे स्वीय सहाय्यक जगन्नाथ उर्फ भाऊसोा कापसे, मायभूमी फौंडेशनचे संचालक प्रकाश इनामदार, गोरख पवार व नंदकुमार घार्गे यांची प्रमुख उपस्थिती होती.