
स्थैर्य,सातारा, दि. ६: : अन्न व औषध प्रशासनाने गेल्या दोन दिवसात गुटखा व तत्सम प्रतिबंधीत अन्न पदार्थ विक्री करणाऱ्यांना दणका देत धडम मोहीम राबवली. यामध्ये गुटख्याचा साठा व गुन्ह्यात वापरलेली वाहने असा मिळून 3 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत माहिती अशी की, अन्न व औषध प्रशासन सातारा कार्यालयाने दि . 3 ते 5 या कालावधीत प्रतिबंधित अन्न पदार्थाची अवैध विकी रोखण्याच्या मोहिम राबविली. यामध्ये अतंर्गत सातारा जिल्हयात विविध ठिकाणी कारवाई करुन गुटखा , पानमसाला , सुगंधित / स्वादिष्ट तंबाखु / जर्दा , तसेच सुंगधित स्वादिष्ट सुपारी चा साठा व प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे वाहन असा एकुण ३ लाख ४१ हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे. किंमतीचा साग जप्त करण्यात आला . दि . 3 रोजी महेश हणमंत यादव, रा. कुमठे, ता. कोरेगाव, जि. सातारा यांचे वाहन (एमएच ११ बीएल ४६४३ ( पे रिक्षा ) मधुन सिव्हील रोड , सातारा या परिसरात अवैध रित्या प्रतिबंधित अन्नपदार्थाची विकी करीता वाहतूक करित असताना पकडण्यात आले. त्याच्याकडून प्रतिबंधित अन्नपदार्थाचा एकुण किंमत २५हजार ६२८ रुपये व वाहन किंमत अंदाजे १ लाख ७० हजार असा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले . त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानदे कायदयांच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दि. ०४ रोजी सुभाष सदाशिव कोकरे वाहनचालक व जितेंद्र गोविद चिंचकर वाहनमालक , दोघे रा. वसंतगड, ता . कराड , जि.सातारा यांचे वाहन (एम एच ११ वाय ४०८९) मधून अवैध रित्या प्रतिबंधित अन्नपदार्थाची विक्री करीता वाहतूक करित असताना पकडण्यात आले. त्यांच्याकडून प्रतिबंधित अन्नपदार्थाचा एकुण किंमत ८७, हजार ४९८ तसेच त्यांचे वाहन किंमत अंदाजे 80 हजार असा मुद्देमाल जप्त कसन पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर कराड तालुका पोलीस स्टेशन , कराड येथे अन्न सुरक्षा व मानद कायदयांच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई एस. एस. देसाई, सह आयुक्त , पुणे विभाग , अन्न व औषध प्रशासन तसेच सहायक आयुक्त ( अन्न ) सातारा श्री . दि . तु . संगत यांचे मार्गदर्शनाखाली कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी श्री . आय . एस . हवालदार , व श्री . आर . आर . शहा यांनी घेतली आहे.
वाहनचालकाचा परवाना व वाहनाची नोंदणी रद्द करण्यासाठी संबंधित मोटर परिवहन अधिकारी यांचेकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. येथून पुढे ही सदर मोहिम प्रशासनामार्फत जोरदारपणे राबविण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासच्या वतीने देण्यात आली आहे.